प्रतिसाद लिहितांना माझ्या ब्लॉग चा दुवा कसा जोडता येइल ?प्रतिसाद लिहिताना संपादकाचे तळव्यात एचटीएमेल संपादनाचा पर्याय आहे, तो निवडावा. एचटीएमेल संपादनाचे वेळी
जे दुवे जोडायचे आहेत ते
<a href = "http://.......">येथे दुव्यातला दर्शनी मजकूर< /a >
अशा पद्धतीने लिहावे. आणि तळव्यातला डिझाईन चा पर्याय निवडून नेहमीचे संपादन पुढे करावे. दुव्याच्या दर्शनी भागात जर देवनागरी व्यतिरिक्त मजकूर असेल तर दर्शनी भाग बदलून 'दुवा क्र. १' असा बदल आपोआप होईल.
जास्त त्रास होत असेल तर आपल्याला प्रसिद्ध करायचा मजकूर या दुव्यावर पाठवून द्यावा व कोठे जोडायचा ते सांगावे.