शुभांगी येथे हे वाचायला मिळाले:

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा!
कुसुमाग्रजांची 'कणा' कविता कितिदाही वाचली तरी शेवटच्या या ओळी वाचताना डोळे भरुन येतात, आणि मनात दादांच्या आठवणी दाटून येतात. दादा , माझे वडील त्यांना जावुन या जून मध्ये सत्तावीस वर्षे झाली,पण आजही मनातील त्यांच्या आठवणी ताज्या आहेत.अवघे बावन्न वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले,पण तेवढ्या काळात त्यांनी कित्यॆक जन्माचे त्रास भोगले, कष्टं केले,संकटे झेलली मात्र हे सगळे अगदी हसत हसत.
लहान वयात त्यांचे वडील गेले, लहान धाकटी भावंडे, अडाणी आई कुणाचाच आधार ...
पुढे वाचा. : दादा