बराच क्लिष्ट आणि गोंधळात टाकणारा विषय आहे खरा. स्वामीयोगेश यांचा प्रतिसादही बराच ऍब्स्ट्रॅक्ट असूनही बरोबर आहे (कारण विषयच तसा आहे, आणि विषयाला बाजूपण खूप आहेत. जसं दुसऱ्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे ही एक बाजू आहे.) आपल्याला अपेक्षित आहेत तशा प्रत्येकाच्या कार्यकक्षा ठामपणे (काँक्रिटली) ठरवणं अवघडच आहे. साधारणतः गाईडलाइन्स असतात की कोणत्या प्रकारची कामं कोणी करायची. गरज पडली तर दुसऱ्याची जबाबदारी पण आपण उचलतो (विशेषतः त्याच्या अनुपस्थितीमध्ये), ह्याचा अर्थ त्याचे अधिकार आपल्याकडे आले असे नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला, एक म्हणजे, आपल्याला त्या कंपनीमध्ये काही काळ घालवावा लागतो आणि दुसरे, ती कंपनी/संस्था स्वतः तेव्हढी मॅच्युअर हवी.
एक उदाहरण म्हणून थोडक्यात जपानमधली कार्यपद्धती सांगतो. जपानमध्ये, असच प्रत्येकाच्या कार्यकक्षा काँक्रिटली ठरवलेल्या नसतात. एक मॅनेजर असतो, त्याच्या हाताखाली १० ते ५० पर्यंत लोकं असतात. त्या सगळ्या लोकांची सिनिऑरिटी वेगवेगळी असली तरी पद एकच असतं. पद एक असलं तरी अधिकार मात्र वेगवेगळे असतात. आणि हे अधिकारसुद्धा दरवेळेस मॅनेजरने अधिकृतपणे बहाल केलेले असतात असं काही नाही. सगळं काम प्रोऍक्टिव्हली चालतं (जे आपल्याकडे अजिबात नसतं, आपल्याकडे बॉस सांगणार ते आपण करणार). निर्णय मात्र सगळे जण मिळून घेतात (जॅपनीज ग्रुप डिसिजन मेकिंग वर तुम्हाला खूप काही वाचायला मिळेल... ). हि अशी आपल्यापेक्षा खूप वेगळी मॅनेजमेंट किंवा वर्क स्टाईल आहे, ज्याच्यात, कार्यकक्षा खूप संदिग्ध असतात.
हा प्रतिसाद किती जमलाय माहित नाही, पण एक प्रयत्न करून बघितला.