प्रशासनाला परिपत्रके काढण्याची संवय असते. सर्वसाधारणपणे ही परिपत्रके संदिग्ध आसतात. त्याबद्दल काही विचारणा केली तर परिपत्रक स्पष्ट आहे असे सांगून अप्रत्यक्षपणे तुम्हाला परिपत्रक समजण्याचीही अक्कल नाही असे सुचवले जाते. परिपत्रकाप्रमाणे कृती केल्यामुळे श्रेय मिळत असेल तर ते प्रशासक लाटतो. जर परिपत्रकाप्रमाणे कृती परिपत्रक काढणाऱ्यावर शेकत असेल तर परिपत्रकाच्या संदिग्धतेचा फायदा घेतला जातो व कृती करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याचा बरोबर अर्थ लावला नाही असे सांगून त्याची जबाबदारी कृती करणाऱ्यावर ढकलली जाते. सरकारी खात्यात या गोष्टी सर्रास चालतात.