सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी. योगप्रभू म्हणतात तसे, कोशात 'सेनापती' 'सुमंत' नाहीत. सेनाकर्ता व सेनानी, आणि सुमंत्र आहेत. अनेक प्रांतांवर नेमलेल्या अधिकाऱ्यासाठी सुमंत्र(फारसी, कारमुल्की! ). वजिरासाठी
सामंत(प्रधान नाही! ) (सामंत म्हणजे स्वतंत्र नसलेला छोटा राजा,; लष्करातला वरिष्ठ अधिकारी) आणि सरनोबतसाठी सेनानी
आणि दलवायी.
म(मु)जुमदारासाठी अमात्य आणि हुकूमतकरिता सेनाकर्ता, सुर्नीस ला प्रतिशब्द सचिव आणि पेशवाला प्रधान. दिवाण हा शब्द सापडला नाही.  शिवाजीपुरस्कृत राजव्यवहारकोशातील मूळ श्लोक असेः
अमात्यः स्यात् मजुमदारः सेनाकर्ता हुकूमतः ।  (राजव्यवहारकोश १. ३)
वाकनीसोऽपि मंत्री स्यात् न्यायाधीशोप्यदालतः ।
कारमुल्की तु सुमंत्रः स्यात् सभासद् स्यात् मजालसी ॥ (राव्यको १. ४)
शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा । (१. २)
सामंतोऽस्तु वजीरः स्यात् सैन्यं लष्करमीरितम् ।
सरनोबतस्तु सेनानी जुमलेदारः शताधिपः ॥ (६.१)
पदातिसैन्यं हशमं प्यादा पत्तिः प्रकीर्तितः ।
तत्र सरनोबतो यस्तु दलवायी स ईरितः॥ (६.५) इत्यलम् ।