आकारान्त पुल्लिंगी नामाला प्रत्यय लावला की अंत्य 'आ'चा 'या' होतो(जसे घोडा-घोड्याला) हे मान्य. त्यामुळे लाल्यालासारखे सिराजौद्दौल्याला व्हायला पाहिजे हे कबूल. परंतु विशेष नामाचे प्रत्ययासाठी हाल केले नाहीत तरी चालते. केशवभाई शहाला(शह्याला नाही! ), तसेच मुथाला, भुतडाला, दाजिबाला वगैरे. मालुसऱ्याला होते कारण त्यात मूळ शब्द मालुसरा नाही तर मालुसरे आहे असे गृहीत धरले जाते. त्यामुळे 'लालाला'प्रमाणे सिराजौद्दौलाला अगदीच चूक म्हणता येणार नाही.
तरीसुद्धा, 'सिराजौद्दौल्याला' असे लिहिणे अनुचित झाले नसते.