आपल्या ह्या चर्चेच्या संदर्भात हे दोन समानार्थी शब्द विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून आलेले आहेत; भूत, वर्तमान वा भविष्यकाळाची रुपे क्रियापदांची असतात. क्रियापद म्हणून वापरलेले, आणि विशेषण/क्रियाविशेषण म्हणून  वापरलेले डॅम/डँम्ड ह्यांच्या अर्थातही फरक आहे.
क्रियापद : टू डँम -> नरकवासाची शिक्षा देणे, किंवा एखाद्यास गुन्हेगार सिद्ध करणे अथवा तसे सुचवणे
विशेषण/क्रियाविशेषण : डॅम/डॅम्ड -> त्रागा, वैताग व्यक्त करणे, उक्तीस जोर (एंफसिस) देणे