एकटे अरुण फडके दुर्मीळच्या बाजूने आहेत. त्यांचा सर्व भर, मिळणे या क्रियापदातील मूळ धातू 'मीळ' (क्रियापदाचे आज्ञार्थी द्वितीयपुरुषी एकवचनी रूप मूळ धातू सांगतो!)आहे यावर आहे. 'मीळ' हे नाम आहे हे कुणीच लक्षात घेतलेले नाही. तसे केले तर, दुर्दैव/दुर्दशा या रूपांप्रमाणे दुर्मीळ हे रूप सिद्ध होऊ शकते. अरुण फडक्यांच्या समर्थनासाठी हा मुद्दा विचारात घ्यायला हरकत नाही.