गजल आवडली. आपण ही रचना 'गजल' म्हणून दिलेली नाहीत, पण तंत्र गजलेचे आहेच, आशयही उत्तमच गजलेचा आहे. सर्वच्या सर्व शेर आवडले.
आपल्यासाठी आणखीन काही शॉर्टफॉर्म्स देत आहे. कृपया गैरसमज नसावेत.
ल. पा. आ. त. मा. पा. आ. - म्हणजे
लयीकडे पाहणे आवश्यक तसेच मात्रांकडे पाहणे आवश्यक!
त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही - २८
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवीत गेले. - २९
वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले - २८
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवीत गेले. - २९
आपल्या उडवीत, अडवीत, तुडवीत मधील 'वी' पहिला घेतल्यास हा प्रॉब्लेम येऊ नये.
मात्रांची चूक जराशी, पण गाजावाजा केला
बेफिकीर होण्यासाठी, बस ढोलच बड'वि'त गेले
-सविनय
बेफिकीर!