चमत्कारांनी भरलेल्या आपल्या ह्या लेखाच्या अनुषंगाने काही प्रश्न पडले आहेत ते असे...
भक्तीचे प्रकार कोणत्या वेदांत सांगितले आहेत? ते किती व कोणते?
देवांचे गुणवर्णन असलेली काही भजने, कीर्तने वानगीदाखल देता येतील काय? त्यातील किती देव वैदिक (वेदांत उल्लेखलेले) आहेत आणि त्यांची गुणवर्णने असलेली भजने किंवा कीर्तने कोणती आहेत?
शब्दांचा अर्थ न कळता अनावधानाने जरी देवाचे पवित्र नामस्मरण केले तरी त्याचा आश्चर्यकारक परिणाम घडलेला दिसतो, हे गुणकारी औषध जरी आपघाताने घेतले तरी ते आपल्या शरीरातील दोष नाहिसे करते.
एकादा आजारी माणूस औषधाची गोळी घेतांना कधीही ती गोळी कुठल्या घटकांनी बनली आहे याचे पृथःकरण करत नाही. त्याचा परिणाम चांगला की वाईट होईल याची माहिती नसूनही तो ती गोळी घेतो.
ही दोन्ही विधाने सारखीच नाहीत काय?
मग गोळीचा कर्ता आणि दाता यांची आपल्याला पूर्ण माहिती असताना अर्थात डॉक्टरने आपल्याला तपासून गोळी दिलेली असताना ती खाणे नामस्मरणाच्या गोळीपेक्षा अधिक सुरक्षित नाही का? किंबहुना त्यानेच लोक जास्त बरे झालेले आहेत.
साध्या साध्या रोगांवरही ज्या काळी औषध नव्हते आणि असे रोग झालेली माणसे नामस्मरणाने बरी झाली नाहीत त्याचे काय? बरी झाली असती तर औषधांचा शोध लागायलाच नको होता आणि वैद्यकशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याची गरजही पडायला नको होती.
वरील प्रश्नांच्या उत्तराने माझे समाधान झाले तर नामस्मरण सुरू करण्याचा माझा विचार आहे तेव्हा....
हिंदू धर्मग्रंथ कोणता? त्यात देवाची कोणकोणती (पवित्र) नावे आहेत? हे सांगावे म्हणजे मलाही षड् रिपूंपासून मुक्ती मिळेल आणि माझा मोक्षाचा मार्ग सुकर होईल. (आपण वेद आणि शास्त्रांचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न हिंदू धर्माशी निगडीत आहे. मात्र इतर धर्मातील देवांची पवित्र नावे आणि त्यामुळे बरे झालेले भक्त यांचेही पुरावे देता आले तर फारच उत्तम ! )
धन्यवाद !