शिवा धर्मे आणि विकीकर यांच्या विचारांशी सहमत.

मराठी प्रतिशब्द शोधण्यापेक्षा शब्दांचं मराठीकरण जास्त स्वागतार्ह आहे. (उदा. वीकएंड या शब्दापासून मायबोलीकारांनी सुचवलेला वीकांत हा शब्द).

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा भाषांपासून जन्मलेल्या मराठीवर नंतर फार्सी भाषेचेही संस्कार झालेत. सांस्कृतिक देवाणघेवाण होते त्याचाच एक भाग म्हणजे इतर भाषांमधले शब्द उचलणे. ही प्रक्रिया मराठीतच नव्हे, तर इतर भाषांमध्येही आहे. जंगल, गुरू हे शब्द इंग्रजीमध्ये उचलले आहेत! इतर भाषांमधल्या शब्दांचा भडिमार होऊ नये हे मान्य. पण केवळ प्रतिशब्दासाठी प्रतिशब्द सुचवणं हास्यास्पदच नव्हे, तर अशक्यसुद्धा आहे. संस्कृतातून मराठी निर्माण झाली हे खरं असलं, तरी केवळ प्रतिशब्द हवे म्हणून संस्कृत पर्याय सुचवल्याने मराठीची वाढ खुंटू शकते. गंगेला गंगोत्रीतून बाहेर वाहू द्या. गंगोत्रीकडे वळवलंत तर लोप पावेल.