ह्या प्रभातच्या सिनेमात मी 'बेस झालास कि रं' हा शब्दप्रयोग ऐकल्याचा स्मरतो.
प्रसंग : आवडाबाई तिच्या आजारी मुलाला विठोबासमोर नेऊन आपटते, आणि थोड्या वेळाने तो उड्या मारीत बाहेर येतो, तेव्हा त्याच्या गालावरून हात फिरवीत, ' बेस झालास कि रं माझ्या बाबा, आई मंगळाई, देवा खंडेराया.... ' असे काही तरी म्हणते.
हा प्रसंग पाहताना मला नेहमी शंका यायची 'बेस' म्हणजे काय? आणि हा शब्द तुकारामांच्या काळातही वापरला जात होता की काय?
हेमंत मुळे म्हणतात तसा तो 'बेस्ट' पासून आला असेल, तर तुकारामांच्या काळापासूनच इंग्रजी शब्द मराठीकरण करून मराठीत यायला सुरुवात झाली असे म्हणता येईल.
तज्ज्ञांनी अजून माहिती द्यावी.