शिवाजीसारखा नृपश्रेष्ट निर्माणच व्हावा लागतो हे हा शब्दकोश बघितल्यावरच लक्षात येते.
मराठीभाषेच्या इतिहासात ज्ञानेश्वर, शिवाजी आणि सावरकर अशी परंपरा मानायला हरकत नसावी.
मराठी भाषेत प्रचलित असलेल्या परकिय भाषेच्या सुळसुळाटाला शिवाजीने राज्यकारभार कोष निर्माण करून चांगलाच शह दिला होता हे सर्वसाधारणपणे मान्य होण्यास कोणाचेही दुमत नसावे.
घोडा ( अश्व), पागा ( अश्वशाला), साहेब ( स्वामी), अमात्य, कोषागर इत्यादी शब्द त्यात वाचल्याचे आठवते.
शिवाजीला अल्प आयुष्य लाभले, त्याचबरोबर प्रचंड अश्या धकाधकीच्या काळखंडाचा सामना करावा लागला हे आपले दुर्देव. त्याचबरोबर मराठ्यांना शिवाजीसारखा कल्पक आणि द्रष्टा असा राज्यकर्ता लाभला नाही हे वेगळेच असे दुर्दैव. पेशव्यांचे राज्य भारतभर पसरले असुनही त्यांना मराठीचा राज्यकारभारासाठी वापर करता आला नाही ही खंत.
शिवाजीची मराठीभाषेची आस आणि परकियांना आपल्या धर्मात घेण्याच्या दोन गोष्टींनी शिवाजी हा एक आगळा आणि वेगळा असा राज्यकर्ता होता हेही नमुद करावेसे वाटते.