आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

अ‍ॅक्शन, हॉरर, कॉमेडी असा चित्रपटांचा प्रत्येक लोकप्रिय प्रकार हा काही ठराविक फॉर्म्युलांना जवळ करतो, असे जेनेरीक चित्रपट पाहाणारा प्रेक्षकही कधी जाणतेपणी तर कधी अजाणता या फॉर्म्युलांची अपेक्षा करत असतो. चित्रपट सुरू होताच लगेचच तो यातल्या कोणत्या फॉर्म्युलाचा आधार घेतो आहे हे तो ओळखतो आणि स्वस्थ चित्ताने पुढला चित्रपट पाहायला लागतो. आकार, स्वरुप, बलस्थानं अशा काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असल्याने त्याची नजर चटकन सरावते. याउलट, जर का त्याला फॉर्म्युला पटकन सापडला नाही, तर तो ग़डबडतो. चित्रपटाकडून कसली अपेक्षा ठेवायची हेच त्याला कळेनासं ...
पुढे वाचा. : द प्रमोशन- विनोद नाकारणारा विनोदपट