साधारण एकसारख्याच प्रस्तावांबाबत दोन वेगवेगळ्या वेळी एकाच अधिकाऱ्याने दोन भिन्न प्रतिक्रिया दिल्या (पहिल्या वेळी लगेच मंजुरी व दुसऱ्या वेळी खेकसणे ) याचा अर्थ त्याला त्याच्या कक्षा आधी माहीत नव्हत्या त्या नंतर माहीत झाल्या.
याचा संबंध 'प्रत्येकाची कार्यकक्षा काटेकोरपणे लिहिणे शक्य नाही की काय' याचाशी नाही.
सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरला टोनर आणण्यासाठी बाहेर पाठवले जात असेल तर तो प्रश्न खालीलपैकी एक
१. माणसेच कमी असणे
२. सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर स्वतः ते काम 'नोकरीच्या भीतीने' नाकारू न शकणे
३. त्याला ते काम सांगणारा तूर्त कंपनीतील अत्यंत महत्त्वाचा माणूस असणे, ज्याला लोक घाबरत असावेत.
या कुठल्याही गोष्टीचा 'कार्यकक्षांची परिपूर्ण व्याख्या होऊ न शकण्याशी' संबंध नाही. प्रत्येकाची भूमिका व्यवस्थित लिहिता येते. याच पद्धतीने आय एस ओ सारखी प्रमाणपत्रे मिळतात. अनेक संस्थांमधून 'सेट ऑफ प्रोसीजर' अशी प्रत्येक पदासाठी एक कार्यकक्षेची परिभाषा असते. आमच्याही संस्थेत आहे.
चर्चाप्रस्तावात मांडलेला प्रश्न हा कमी किंवा नसलेल्या ज्ञानामुळे ( स्वतःच्या व इतरांच्या कार्यकक्षेबाबतच्या ) निर्माण होणारा असून कार्यकक्षा लिहिताच येत नाहीत यामुळे नाही आहे.