उर्दूत शोब म्हणजे धुलाई. ह्याचा संबंध अरबीतल्या साबनशी असेल? आणि म्हणून मराठीतल्या साबणाशी? इंग्रजी सोऽप् कुठून आला? स्टीअरिक, ओलिक, आणि पामिटिक ऍसिडे कॉस्टिक सोड्यात मिसळून कपडे धुण्याचा सोऽप्‌ बनतो. त्या ऍसिडांच्या नावांचा सोऽप्‌च्या स्पेलिंगशी काही संबंध असेल? तुकाराम साबण वापरत किंवा विकत असतील तर ते कोण बनवत असेल? एक मात्र नक्की. ज्या काळात ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमधून कैदी पाठवत असत त्या काळात केरळमध्ये रिठ्यांचाच उपयोग आंघोळीचा साबण म्हणून होत होता. म्हणजे तेव्हा साबण नसावा. मग पुराणकाळातले ऋषिमुनी आणि रामलक्ष्मण आपले कपडे कसे धूत असतील? शिकेकाई किंवा रिठ्यांनी कपडे थोडेच स्वच्छ होणार?