साबण = सापो (लाटीन) = सावों (फ्रेंच) = साबांओ (पोर्तुगीज) = साबून (कुर्द आणि तुर्क)
संदर्भ - विक्शनरी
त्यात इंग्रजी शब्दाचं मूळ - प्रोटो - इंडो - युरोपिअन सीब (गळणे, ठिबकणे, ओतणे, वगैरे) असं दिलं आहे.
तुकारामाच्या काळात साबण असण्यास काहीच हरकत नाही, कारण मुळात हमाम (सार्वजनिक न्हाणीघरं) आणि साबण वगैरे मध्यपूर्वेकडून युरोपात गेले. आजही बुडापेस्टमध्ये तुर्कांनी बांधलेले हमाम आहेत. अशा गोष्टी आपल्याकडे येण्यासाठी युरोपिअनांची गरज नव्हती. आपले मध्यपूर्वेशी संबंध बरेच जुने आहेत.