नमस्कार,
तुमचं भारतीय संगीताप्रमाणेच रंगांवरही प्रेम दिसतेय. (शब्दांचा रंग वेगळा आहे म्हणून हा प्रश्न)
- होय. होय. रागाबरोबरच रंगांवरही प्रेम आहे. राग-रंग दोन्ही !
शाळेतही मी वेगवेगळ्या शायांची पेने (!) घेऊन जात असे; पण तिथे एकच एक रंग वापरायचा असायचा. निळा. दहावी संपली आणि मग मीही निळ्या रंगाला सोडचिठ्ठी देऊन टाकली. निळ्या शाईचे पेन मी पुन्हा कधीही वापरले नाही. त्या रंगाची जागा काळ्या शाईने घेतली. आता काळ्या रंगाबरोबरच इतर अन्य रंगही सोबतीला आहेतच; पण निळा नाही. (आता कधी कधी इथे निळी शाई वापरतोही; पण ती म्हणजे शाळेच्या दिवसांना वाहिलेली स्मरणांजली म्हणता येईल, हवे तर !)
.............
नक्कीच! मारवा आणि पुरियातील फरक नक्कीच स्पष्ट करीन.
- मारवा आणि पूरिया या रागांमधील फरक स्पष्ट करणाऱया तुमच्या पुढील टिपणाची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरात लवकर लिहावे.
मारवा ऐकावा तर बडे गुलाम अली खॉं यांचाच, असे म्हटले जाते; शोधूनही त्याची त्याची रेकॉर्ड, कॅसेट, सीडी मिळाली नाही. परिणामी, ऐकायचा राहून गेला आहे. पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे यांचा मारवा मला खूपच आवडतो.
- सहज आठवले म्हणून ः पं. भीमसेन जोशींचा आसावरी तोडी (कोमल ऋषभ) तुम्ही ऐकलेला असेलच. वा...वा...वा... !
.............
- झिंझोटी या रागाबद्दलही सवडीनुसार लिहावे. - अब्दुल करीम खॉंसाहेब हा राग खूपच बहारदार गात असत, असे ऐकले आहे.
असो. भारतीय रागसंगीतावर जेवढे बोलावे, तेवढे थोडेच. जन्म पुरणार नाही!
.............
उत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.
.............