पिलाष्टर, जर्मल, चेचीज, ओवरॉयलिंग असे अनेक शब्दही तळागाळातल्या मराठीत रूजले आहेतच. पण ग्रांथिक मराठीवर 'अळुपिष्टनीकरण' लादावे काय हा सवाल आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

...(कदाचित सतराव्या किंवा) अठराव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत किंवा कदाचित विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातसुद्धा सहज खपले असते आणि खपत असे, असे वाटते. आजच्या जमान्यात कदाचित ते फ्याशनेबल नसावे. तरीही त्यात गैर असे काही आहेच, असे म्हणता येणार नाही. खपले, तर गैर नाही; नाही खपले, तर लादले तरी खपणार नाही, त्यामुळे फरक पडत नाही.