Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा...

त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती.

त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला ...
पुढे वाचा. : देठाफुलाची गोष्ट