अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मी लहान असताना, दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसांपैकी थोडे दिवस, मी माझ्या आईच्या मामांच्या घरी घालवत असे. त्यांचे घर म्हणजे जुन्या पद्धतीचे एकत्र कुटुंब होते. तीन भाऊ, त्यांच्या बायका, मुले व वृद्ध आई वडील एवढ्या व्यक्ती सतत घरात असत. या शिवाय पाहुणा राहुणा आणि नात्यातला कोणीतरी सतत मुक्कामाला असेच असे. घरात एवढ्या व्यक्ती रहात असल्याने घरातला सर्व स्त्रीवर्ग सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कामात असे. माझी पणजी व तिच्या दोन सुना या दिवसभर स्वैपाकघरात काही ना काही करतच असत. त्या वेळेस मला त्यांच्या या कष्टांची कधी जाणीव झाली ...
पुढे वाचा. : खरी स्त्री मुक्ती