सुटलेल्या लोकलचं उदाहरण पटण्यासारखं नाही.  उद्या एखाद्याच्या पत्नीचं निधन झालं तर त्या घटनेकडे तो हळहळ न करता 'जाऊ दे, सुटलेली लोकल फलाटावर परत येऊच शकत नाही' असं म्हणून एवढ्या भावनाशून्यतेनं बघू शकेल?  आहे ते आनंदाने स्वीकारा हे तत्त्वज्ञान सांगणं ज्यांनी आयुष्यातली खरी दुःखं, खऱ्या यातना बघितल्या नाहीयेत, त्यांच्यासाठी अगदी सहज सोपं काम असतं, असं माझं मत आहे.