प्रीति, अगदी खरं सांगायचं तर कथा मला फारशी पटली नाही.  याचं महत्त्वाचं कारण असं की शर्मिलासाठी जेव्हा स्थळं सांगून येत होती तेव्हा - "नको! माझ्याच उंचीचा आहे. आपल्याला तर बुवा सहा फूट उंच नवरा पाहीजे", किंवा "एम. कॉम. एम. बी. ए. करेपर्यंत वय वाढलेलं दिसतंय याचं! नापास-बिपास झाला असेल मध्येच एखाद्या वर्षी!" किंवा "शहाणाच आहे! घरची जबाबदारी नको म्हणे! स्वतः एकुलता एक आहे म्हणून काय सगळ्या जगानं एकुलतं एक रहायचं की काय!" - यासारखे विचार शर्मिलाच्याही डोक्यात आले होते.  फक्त तिच्या आई-वडिलांना आवडणार नाही म्हणून तिने बोलून दाखवले नव्हते.  जी मुलगी स्वतःच अशा प्रकारचा विचार करते, तिला सासू-सासऱ्यांचं असं विचार करणं मात्र खटकतं हे तितकसं पटत नाही.  दुसरं म्हणजे तिनं स्वतःही तिच्या लग्नाच्या वेळेस आलेल्या स्थळांची मनातल्या मनात थोडीशी हेटाळणी केलेली असतेच, असं असताना फक्त मुलाकडचेच लोक असा विचार करतात वगैरे असे तिचे काढलेले निष्कर्ष बरोबर वाटत नाहीत.  माझ्या मते तरी हे फक्त मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू आहेत.  यांना 'मुलाकडचे, मुलीकडचे' वगैरे अशा आवरणात घालणं योग्य होणार नाही.  चू. भू. दे. घे.