भूषण,

बऱ्याच अंशी सहमत.

लिहीता येत नाहीत असे नाही, असे मलाही वाटते. किंबहुना, त्या लिहिण्याचे कष्ट कोणी घेत नसावे. म्हणून असे घडत असावे.

त्याला त्याच्या कक्षा आधी माहीत नव्हत्या त्या नंतर माहीत झाल्या.

काही प्रमाणात खरे. अधिकाऱ्याला नंतर जाणीव झाली. आधी त्याने त्यावर फारसा विचार केला नव्हता.
किंवा
कामाच्या भरात सुरुवातीला तो ते काम करून गेला. पुढील वेळी पध्दत लक्षात आली. 
प्रस्तावात भरः मी एकदा एका रकमेची चौकशी त्याच्याकडे केली, तेव्हा त्याचे उत्तर होतेः ही रक्कम तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही. नंतर एकदा याच रकमेबाबत मी सांगितले की, त्याची माहिती मला नाही. तेव्हा याच अधिकाऱ्याने सूचना केलीःया रकमेची माहिती घ्या व पुढील वर्षीसाठी ती रक्कम तुम्हीच ठरवा.

सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरला टोनर आणण्यासाठी बाहेर पाठवले जात असेल तर तो प्रश्न खालीलपैकी एक

१. माणसेच कमी असणे
२. सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर स्वतः ते काम 'नोकरीच्या भीतीने' नाकारू न शकणे
३. त्याला ते काम सांगणारा तूर्त कंपनीतील अत्यंत महत्त्वाचा माणूस असणे, ज्याला लोक घाबरत असावेत.


तीनही कारणे समान प्रमाणात खरी.

भूषण,
मला वाटते, कार्यकक्षा लिहिता येतात पण त्या लिहिल्या न गेल्याचे माझ्या मताप्रमाणे एक कारण वर दिलेच आहे. (कष्ट)
दुसरे कारण मनोवृत्तीच्या खालील प्रकारात असावेः
१.  बघू आयत्या वेळी.
२. त्यात काय, कोणीही सही करेल.
३. तो विषय फार महत्वाचा नाही.

हा विचार प्रत्येकाने केल्यामुळे अंतिम निर्णय कोणी घ्यायचा व विशिष्ट फाईल कशा पध्दतीने पुढे सरकवायची, हे कधीच निश्चित होत नसावे.