शाळेंत ही कविता 'नवीन वाचन' नांवाच्या पाठ्यपुस्तकांतें होती. आमच्या शाळेंत मात्र 'मंगल वाचन' असल्यामुळें मला नव्हती. पण शाळेंत असतांना पुस्तकें घेतलीं रे घेतलीं कीं आम्हीं एकमेकांचीं मराठीची पुस्तकें अधाशासारखीं वाचून काढत असूं. आपल्या लेखानें ते ठगाळलेले जूनमधले दिवस, नवीन कोऱ्या पुस्तकांचा वास, पुस्तकातले ते धडे, धड्याखालचे शब्दार्थ, त्या कविता, नव्या गणवेषाची ऐट, तें पांढरा शर्ट स्वतः सनलाईट साबणानें धुवून त्याला खळ (स्टार्च) करणे, इस्त्री करणें वगैरे सगळें पुन्हां जिवंत झालें. धन्यवाद.

सुधीर कांदळकर