अशीच खमकी होती. निळ्या पट्ट्यांच्या पहिल्या वर्गाच्या डब्यांत पूर्वीं संध्या सातनंतर पुरुषांना प्रवेश असे. पण पावणेसातच्या सुमारास दादरला येणाऱ्या विरार गाडींत पुरुष प्रवासी घुसत. त्यांना ही महिला एकटी हात पसरून दरवाजा अडवून हुसकावून लावीत असे. तरीही कोणी बळाचा वापर करून घुसलाच तर साखळी खेचून गाडी थांबवत असे. सातपूर्वीं त्या डब्यांत सापडल्यास दंड होईल म्हणून सर्व घुसलेले प्रवासी पटकन उतरून पळ काढीत. कांहीं खट्याळ तरूण मात्र तिला नेहमीं उगाचच त्रास देत.
बहुतेक प्रवासी तेव्हां तिला ओळखत आणि ती दिसली तर मागच्या लाल पट्ट्याच्या पुरुषांच्या डब्यात घुसत.
सुधीर कांदळकर.