तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
भाषांतर उत्तम झालंय आणि ते चालीतही बसतंय.
भाषांतर आणि चाल तपासून पाहिल्याबद्दल धन्यवाद.
पण..
"----" असं आहे.
त्यामुळं न दृष्ट कुणाची "पडो" च्या ऐवजी "लागो" असं नको का?याकडं कुणीच कसं लक्ष दिलेलें नाही?
कुणीच दिल नाही असे का म्हणता? मी दिले ना लक्ष
एखाद्याला दृष्ट लागणे आणि एखाद्यावर दृष्ट पडणे असे दोन्ही म्हणता येते. दृष्ट पडणे हे खास मराठी! शिवाय वृतातही लागो ऐवजी पडो नीट बसते ना!
असो.
अशीच परीक्षा करत जा. त्यामुळेच आणखी आणखी चांगले लिहावेसे वाटते. धन्यवाद.