मृगनयना, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

यासारखे विचार शर्मिलाच्याही डोक्यात आले होते. फक्त तिच्या आई-वडिलांना आवडणार नाही म्हणून तिने बोलून दाखवले नव्हते.

मूळ मुद्दा हाच तर आहे. प्रत्येकानं आपापल्या मनात काय काय विचार करावेत यावर कुठल्याही बाह्य गोष्टींचं बंधन नसतं. पण जेव्हा ते विचार उघडपणे व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या आसपासच्या लोकांचा थोडा विचार करावा. (लोकशाही असली तरी) किंवा असं म्हणता येईल की विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दल विचार करावा. शर्मिलाचा आक्षेप त्या पद्धतीला आहे. सून म्हणून आपल्या घरात आलेली एक व्यक्ती समोर बसलेली असताना, होऊ घातलेल्या सुनेबद्दलची टिप्पणी तोलूनमापून व्हावी अशी तिची अपेक्षा आहे. खरंतर ती 'आपणही चेष्टा केली होती' हे प्रांजळपणे कबूल करते, सासरच्यांबद्दल आपण करतोय तो विचार चुकीचा तर नाही ना हे स्वतःला पुनःपुन्हा विचारते. नचिकेतलाही याबद्दल काही सांगावं असं तिला वाटलेलं नसतं. म्हणजे थोडक्यात ती संभ्रमात आहे. तो संभ्रमच कथेचा गाभा आहे.