तुम्ही म्हणता ती गोष्ट माझ्याही कानावर आली होती. पण १९८८ च्या आधी. साधारण १९७४/७५ साली मुंबईत ही अफवा पसरली होती. नंतर ती पुण्यात आली असेल. अफवांचा उगम कधीच सापडत नसतो. मला आठवते आहे १९६५/६६ साली तर ठाण्यात अशी अफवा पसरली होती की रात्रीच्या वेळी आकाशातून एक प्रेतयात्रा जाते. अक्षरशः एक तिरडी, चार माणसे आणि त्या प्रेतावर फुले उधळणारी माणसे शिवाय एक बाई रडत असते. आमच्याकडे त्यावेळी काम करणारी बाई सांगत होती की ती रात्री बाथरूमला बाहेर आली तेव्हा तिने हे बघितले. नंतर मला वाटते ठाण्याला एक साधुंची टोळी पोलिसांनी पकडली होती. ते फुग्यांपासून हे चित्र बनवून घबराट पसरवत होते. पुढे त्याचे काय झाले ते माहित नाही.