पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो ) वा वा !

येणारच नसते गाडी कुठली, कोणी
नुसताच फलाटावर रेंगाळत असतो ! सुंदर ... खूप सुंदर !

अंधारच असतो ह्या खोलीत परंतू,
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो!

हाही आवडलाच.
ह्यातल्या दुसऱ्या ओळीत, 'एखादा क्षण' च्या ऐवजी 'क्षण एखादा' असे कानाला जास्त चांगले वाटले (मला तरी)
क्षण आणि घनदाट मधला 'घन' एकत्र आल्याने थोडेसे अडखळायला झाले. (मला तरी)

शुभेच्छा !