१९५५ ते १९६० या दरम्यान केव्हातरी ठाण्यात हाकामारीची अफवा पसरली होती. त्यावेळी मी शाळेत होतो.
त्यानंतर केव्हातरी नीता आंबेगावकर म्हणतात त्याप्रमाणे आकाशातून जाणाऱ्या प्रेतयात्रेची अफवाही ऐकली होती. प्रत्यक्षात ती "प्रेतयात्रा" दिसते का म्हणून (किंबहुना दिसेल की काय या भीतीने) रात्रीच्या वेळी आकाशाकडे पहायचा त्यावेळी धीर झाला नाही.