मीही ही बातमी वाचली होती आणि पुस्तक वाचण्याची उत्सुकता होती.

कुठच्याही राजकीय, वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता खऱ्या अर्थानं सेवाभावी वृत्तीनं नर्मदा बचाव आंदोलनासारखं प्रचंड आंदोलन जी स्त्री उभी करू शकते, अशा स्त्रीचं मतही तेव्हढंच महत्त्वपूर्ण, विचारप्रवर्तक असतं.  वर सौरभच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "त्यांचं काय जातंय मत मांडायला" असं म्हणून त्यांच्या मताची हेटाळणी आपण करण्याएवढ्या त्या अविचारी बडबड करणाऱ्या नक्कीच नाहीत. 

एनाराय लोकांमधले बरेचसे इथल्या अडचणींना, कटकटींना कंटाळून किंवा परदेशातल्या अधिक सुखवस्तू राहणीमानाकडे आकर्षित होऊन हा देश सोडून निघून गेलेले असतात.  अशा लोकांना या देशासाठी काही करण्यापेक्षा या देशावर टीका करण्यात जास्त स्वारस्य असतं असं माझं मत आहे.  वर सौरभच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे बऱ्याच एनारायज ना देशासाठी असं काही करणं म्हणजे ""... सांगीतलय कोणी विकतच दुखणं... " असंच वाटणं जास्त शक्य आहे.  त्यामुळे अशा लोकांचा भ्रष्टाचार विरोधात दबावगट तयार होण्याची अपेक्षा बाळगणं जवळ जवळ दुरापास्तच.  मेधा पाटकरांनी जसं नर्मदा खोऱ्यातल्या खेडूतांना, अशिक्षित लोकांना, गोर गरिबांना हाताशी धरून आंदोलन उभं केलं तद्वतच एखादा जगन्नाथ वाणीच कदाचित या इनडिफरन्ट एनारायजची आवळ्याची मोट बांधू शकेल आणि कदाचित असा दबावगट तयार करू शकेल.  अन्यथा यांचा दबावगट म्हणजे फक्त उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांसारखाच होईल.