वरील प्रश्नांकित 'आय' ज्यात अंतर्भूत आहे त्या सिलबलच्या स्पेलिंगच्या शेवटी 'ई' हे अक्षर येते. यावरून या "अपवादां"करितासुद्धा काही नियम असावा काय?
नियम नाही म्हणूनच अपवाद म्हणायचे. अपवाद नसले तर नियम सिद्ध होणे अवघड. फाइन्ड, माइन्ड, काइन्ड, बाइन्ड, Sign मध्ये शेवटी ई नसताना आय् चा उच्चार आइ होतो. Wind चे विन्ड आणि वाइन्ड दोन्ही होतात. पण तशाच प्रकारचे स्पेलिंग असलेल्या हिन्ट, पिन्ट मध्ये आइ हा उच्चार होत नाही. फारतर असे म्हणता येईल की शेवटी ई असताना उच्चार आइ होत नसेल तर (मरीन सारख्या शब्दांत) आय चा उच्चार दीर्घ ई होतो.
इंग्रजी शब्दांचे उच्चार खालील प्रकारे निश्चित होतात. (१)स्पेलिंगप्रमाणे(२)शब्दाच्या व्याकरणानुरोधाने(३)शब्दाचा इतिहास वा व्युत्पत्तीनुसार (४)स्वराघातान्वये (५)खंड-देश-प्रान्तपरत्वे किंवा (५)केवळ रूढी म्हणून. त्यामुळे मरीनमध्ये री दीर्घ का याचे कारण वरीलपैकी एखाददुसरे किंवा अन्य काही असू शकेल.
तसेच शब्दाचे स्पेलिंग हे उच्चार/व्याकरण/व्युत्पत्ती/स्वराघात किंवा रूढीनुसार ठरते.
शब्दात नुसता आय् असून उच्चार दीर्घ ई असल्याचे Invalid इन्व़लीड((क्रियापद) हे एकुलते एक उदाहरण मला माहीत आहे.