1. 'नाईन प्युरिटी' ही किंमती धातूंच्या (प्रेशियस मेटल्स) वर्गीकरणाची एक पद्धत आहे.  म्हणजे एखादा धातू 'वन नाईन' आहे म्हणजे ९०% शुद्ध आहे असं म्हणता येतं. 
  2. माझी खात्री नाहीये पण मला असं वाटतं की फुटबॉल मध्ये सेंटर फॉर्वर्ड खेळणारा खेळाडू नऊ क्रमांकाचा टी शर्ट घालतो.  चू. भू. दे. घे. 
  3. नाईन चॅप्टर्स ऑन मॅथेमॅटिकल आर्ट हा चायनीज गणितावरचा उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो.  दुवा क्र. १ या दुव्यावर हा ग्रंथ बघता येईल. 
  4. रॉब मार्शल या दिग्दर्शकाचा 'नाईन' नावाचा एक नविन इंग्रजी सिनेमा येऊ घातलाय.  मध्यवयीन अडचणींच्या (मिडलाईफ क्रायसिस) विषयावर आधारलेल्या या चित्रपटाबद्दल रसिकांच्या (विशेषतः अमेरिकेतल्या) मोठ्या अपेक्षा आहेत.  अधिक माहितीसाठी दुवा क्र. २  बघा.