बहिणाबाईंच्या काव्याचा थोडक्यात घेतलेला आढावा आवडला.

त्यांच्या प्रतिभेला दाद द्यावी तेवढी थोडीच! एका अडाणी, अशिक्षित आणि खेड्यात आयुष्य गेलेल्या स्त्रीचे साधे-सरळ विचारही किती मार्मिक आहेत. त्यांचे काव्य हे रोजच्या कामाच्या रहाटगाड्यात सुचलेले असल्याने आजच्याही काळात तितकेच लागू होते असे वाटते.