आपली कविता, तिच्या विषयाच्या दृष्टीने 'सुन्न' करणारी आहे.
पण जरा शब्द वापरताना काळजी घ्या ना.
उदा; प्यायलेले पीत घाईने जमी पानावरी.
जमी हा कोणता शब्द बुवा? प्यायलेले हा जर बहुवचनी अर्थाने असेल, तर प्यायलेले पीत घाईने पानावर जमतात.
असे वाक्य होईल. कवितेत आणि वृत्तात बसवायचे म्हणून शब्दांची बेफिकीर कत्तल कशाला?
तीच गत कावळे कुत्री तिथे घोंघावुनी कल्ला करी. कल्ला करतात. असे हवे. कल्ला करी हे अजिबातच योग्य नाही. पुन्हा, कावळे आणि कुत्री कशी घोंघावतात हो? एकत्र येणं वेगळं. घोंघावतात त्या माशा.
विषय चांगला असूनही, ह्या शब्दवापरामुळे आवडली नाही कविता. अजून प्रयत्नपूर्वक लिहा, आणि ह्याच कवितेच्या 'जमी' 'करी' ऐवजी वेगळे शब्द वापरता येतात का ते बघा.