लिहिता लिहिता विचारांचा गोंधळ वाढला-बिढला नाही. ही विचारांची वेटोळी न संपणारी आहेत. त्यामुळे कथानायिका तिच्या सद्य परिस्थितीचे संदर्भ त्या विचारांना लावून थांबते. भविष्यात ते विचार कशी वळणं घेतील हे तिलाही ठाऊक नाही.