प्रीतीजी, तुमचा लेख खूपच आवडला. विशेषतः  "मुंबईच्या " मुलीवद्दल जे शर्मिलाच्या सासूबाईंचे विचार तुम्ही दाखवले आहेत ते खूपच पटले. कारण मी स्वतः मुंबईची आहे. माझ्या सासूबाईंचे हेच विचार होते. (माझे सासर नागपूरला आहे. ) मुंबईच्या मुलींना काही वळण नसते. हा त्यांचा लाडका (आणि गोड वगैरे) गैरसमज पण ठाम होता. म्हणून त्यांनी माझ्या दिरासाठी नागपूरचीच मुलगी केली. गंमत म्हणजे "मुंबई"च्या वळण नसलेल्या मुलीने त्यांच्या वळणात १० वर्षे "काढली" आणि नागपूरच्या "वळणदार" मुलीने २ वर्षांत त्यांनाच वळण लावले. शिवाय आपली मुलाची बाजू आहे म्हणून आपण जेवढ्या मुली नाकारू तेवढा आपला भाव वाढतो असा त्यांचा दुसरा गैरसमज असावा. कारण माझ्या आते नणंदेची नणंद त्याच्यासाठी सांगून आली तेव्हा तो नाही म्हणत असतानाही "बघायला काय जातं" म्हणून तिला बोलावून नंतर नाही सांगितले. अशी माणसे या जगात अजुनही आहेत. तरी बरं की स्वतःच्या पदरात एक मुलगी होतीच. ही माणसाची सनातन वृत्ती असावी. त्याला इलाज नाही. लेखाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.