मुंबईच्या सगळ्याच गाड्यांना सगळ्याच वेळी खूप गर्दी असते. पण रात्री जे लेडीज डवे ओस पडतात त्याला उपाय म्हणजे बायकांनी ठरवून त्या डब्यात जायला हवे. एक दोघींनी होणारे हे काम नाही. दिवसा जसे हे डबे ओसंडून वाहत असतात तसेच ते रात्री राहिले तर हा त्रास काही प्रमाणात तरी कमी होईल असे वाटते. आम्ही कॉलेजला जाताना डब्यात कोणा तरूण मुलांना चढू देत नसू. त्यामुळे बाकीच्या पुरुषांची पण हिंमत होत नसे. अर्थात आता परिस्थिती बदलली असू शकते.