मलाही काही गोष्टी चूकीच्या वाटल्या. सकाळी उठल्याबरोबर खाणे हे एक.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्ययेकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे सगळ्यांना सगळया गोष्टी लागू होतील असे नाही, त्यामुळे पुस्तक वाचून काहीही करू नये. आपल्या फामीली डौक्टर ला विचारुनच बदल करावा. - हे सगळ्यात बरोबर...

बरेच दिवस मला ही एक शंका आहे... कधी आणि किती खावे ह्या विषयी २ विचार आहेत आणि मला दोन्ही पटतात.
१) दर दोन तासानी खा (लाईट ऍंड फ्रिक्वेंट मील्स) - ह्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. जे लोक खूप व्यायाम करतात, जीम मध्ये वगैरे जाऊन, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. कारण, एका वेळेस जास्त खाल्लच जात नाही. हे मी स्वतः खूप व्यायाम करायचो तेव्हा अनुभवले आहे त्यामुळे ह्यात चूक किंवा अनैसर्गिक काही आहे अस वाटत नाही.
२) दुसरा प्रकार - ब्रेकफास्ट सगळ्यात जास्त, दुपारचं जेवण मध्यम आणि रात्री अगदी कमी. हे नक्की कुठल्या प्रकारच्या लोकांसाठी असेल माहित नाहि. कदाचित शारीरिक कष्ट जास्त करण्याऱ्यांसाठी असेल.

सामान्य हापिसात जाऊन नोकरीवाल्यांसाठी कुठला प्रकार योग्य आहे?.. (बहुतेक सगळे ब्रेकफास्ट केला-तर-केला, दुपारी थोडंफार आणि रात्री चापणे ह्या प्रकारात मोडतात..  )