मराठी ही एक झपाट्याने अस्तंगत होत चाललेली भाषा आहे तेव्हा हे असेच होणार.  अलीकडील बहुसंख्य मुलांना किती मराठी बोलता लिहिता अगर वाचता येते.  पालक मुलांशी बोलताना इंग्रजीत बोलतात किंवा इंग्रजी शब्द वापरून बोलतात व त्यांना मराठी पासून दूर ठेवण्यात भूषण समजतात. लहान मुलांशी होणारे संभाषण ऐकल्यास हे सहजच लक्षात येईल.  तेव्हा आता मराठी विषयी कसल्याही अपेक्षा ठेवू नका.  जे होते ते पहात रहा. तेवढेच तुमच्या हाती. इंग्रजी च्या प्रवाहात वाहात चाललेल्या मराठीला तुम्ही वाचवू शकत नाहीं.