मी शाळेत (मराठी माध्यमाच्या) असूनही गणितातले आकडे इंग्रजीतलेच शिकलो असं आठवतंय. मला वाटतं त्याचवेळी शासनानं (एस. एस. सी. बोर्डानं) हा बदल केला. कदाचित आकडे हेही मीटर / किलो प्रमाणे जागतिक पातळीवर एकच वापरले जावेत या दृष्टीनं हा प्रयत्न / बदल असावा.
हा बदल चांगला की वाईट हा मुद्दा बाजूला ठेवून मला असं म्हणावंसं वाटतं की फक्त माध्यमांनाच का दोषी धरायचं? त्या आधीच शासनानं/बोर्डानं हा बदल केला होताच की.
अर्थात माध्यमांच्या अत्यंत आक्षेपार्ह अशा शुद्धलेखनातल्या चुकांबद्दल पूर्ण सहमत!
- कुमार