चित्तोपंत,
गझल आवडली. सगळेच शेर चांगले आहेत; शेवटचे दोन शेर अधिक आवडले.
अंधारच असतो ह्या खोलीत परंतु
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो ... सुंदर!
मी आधी करतो आभाळाची माती
ती माती मग मी भाळी लावत असतो - वा!
बाकीच्या शेरांमध्ये वास्तव (उदा. पंखा, सिग्नल, पाट्या टाकणे, फलाट) आणि भावविश्व यांची सांगड घातली गेली आहे ती आवडली; पण हे दोन शेर आणि ताह्नुल्याचा शेर त्यांतून वेगळे वाटले आणि त्यांमुळे अधिक भावले.
- कुमार