संजोप रावसाहेब,

सुंदर लेख - आवडला. शिवाजी पार्कच्या जवळ 'आस्वाद'च्या थोडं पुढे 'प्रभात तपकीर' नावाचं एक दुकान आहे. त्याचे मालक अतिशय काव्य/संगीत-रसिक आहेत. सुधीर फडके, तलत महमूदशी त्यांची दोस्ती. अनेक जुनी ध्वनीमुद्रणं त्यांच्याकडे आहेत. दुर्दैवानं त्यांचं नाव विसरलो.

त्यांच्याशी गप्पा मारण्याचा एकदा योग आला. मी गझल, गुलजार वगैरे म्हटल्यावर ते मला म्हणाले, गुलजार राहू द्या हो, शैलेंद्र तरी तुम्हाला कळला आहे का?

'आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर मरने का इरादा है' असं तो का म्हणाला? - त्याचं कारण हे आहे -

'आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर (तुमपे) मरने का इरादा है' - तुम पे मरने के लिये जीने की तमन्ना है! वा! (मला हे गाणं अनेकदा गुणगुणूनही हे कळलं नव्हतं... काय करणार! चिठ्ठिया हो तो हर कोई बाटे, भाग ना बाटे कोई!).

तसंच 'वक्त ने किया क्या हसीं सितम, तुम रहे ना तुम, हम रहे ना हम' - ते मला म्हणाले, हे आनंदी गाणं की दुःखी ते सांग. मला 'कागज के फूल' आठवल्यावर तो एक चांगला दुःखी चित्रपट आहे एवढंच आठवतं; पण त्यांनी खुलासा केला - मी मीच राहिलो नाही, हे काळानं माझ्यावर किती मोठे उपकार केले आहेत! - मी मोक्षाची भावना आहे; दुःखाची नाही.

एका कार्यक्रमात मंगेश पाडगावकर शैलेंद्रबद्दल म्हणाले होते, कधी कधी कविता वृत्त-अलंकारांतून मुक्त करणं (आणि तरी सुंदर करणं) हे जास्त अवघड होऊन बसतं.

राजा की आएगी बारात
रंगीली होगी रात
मगन मैं नाचूंगी

इथे 'मगन मैं नाचूंगी' ही ओळ ते म्हणाले अशीच त्रास देऊन गेली.

- कुमार