श्री. संजोप राव
लेख अतिशय आवडला.
माझ्या अजिबात आठवणीत नसलेल्या बऱ्याच गाण्यांचा उल्लेख तुम्ही केला आहे. त्यापैकी "अजीब दास्तां है ये कहां शुरू कहां खतम" या गाण्यातले अंतरे अतिशय सुरेख आहेत
"ये रोशनी के साथ क्यूं धुआं उठा चिरागसे
ये ख्वाब देखती हूं मैं के जग पडी हूं ख्वाब से"
"स्वप्नातून जाग आल्याचे स्वप्न मी पाहते" ही कल्पनाच अतिशय आवडली.
"किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आएगी तुम हमको याद आओगे" याही ओळी अतिशय आवडत्या आहेत.
शैलेंद्रच्या एका एका गाण्यावर लिहायचे म्हटले तरी बरेच लिहिता येईल.
श्री. मिलिंद
शैलेंद्रच्या गाण्यांचा आढावा घेणे अवघड काम आहे. जमेल तसे पूर्ण करायचा प्रयत्न करेन.
विनायक