शंकर पाटील यांनी 'पाटलांची चंची'मध्ये एक सुंदर प्रसंग सांगितला आहे. आईने फक्त मीठमीरची लावून, फोडणी दिलेले शिळ्या भाकरीचे तुकडे किती चविष्ट लागतात यासंदर्भातला. या पदार्थाला भाकरीचा चिवडा असा एक शहरी शब्द आहे पण पाटलांनी या पदार्थाला रायगोंड-मलगोंड असे खास नाव दिले आहे.
विनायक यांच्या सुंदर लेखाला प्रतिसादरुपाने आलेला हा लेखही असा खुसखुशीत आहे. सुगरणीच्या हातचा कोणताही पदार्थ जसा चवदार होतो तसाच एखाद्या लेखकाच्या हाती काहीही विषय असला तरी तो वाचायला कसा रंगतदार होतो याचे हे उत्तम उदाहरण.
बाकी
दोन्ही लेख शैलेंद्रचा,
त्याच्या कारकीर्दीचा सम्यक, संपूर्ण आढावा घेत नाहीत, वाचकाला दोन घोट
पाजून तृष्णा वाढवतात ही एकच तक्रार आहे.
अशी माझी तक्रार नाही. ते काम जाणकारांचे. असे लेख वाचूनच आमचे पोट भरते. :)