ही नावे ऐकून फार बरे वाटले. भीमगोंडा, नरसगोंडा, श्यामगोंडा, जयगोंडा अशा लोकांच्यात मी वाढलो. माझे शाळूसोबती रायाप्पा, भरमाप्पा, धुळाप्पा अशा नावांचे होते. आडनावेही भगाटे, संकेश्वरे, धुळुबुळू, ऐनापुरे, टेंगिनकिरे, आलासे, बुबनाळे, कऱ्याप्पा, आणुसे असली खडबडीत होती. आता यातले बरेचसे (नाईलाजाने) शेतकरी झाले आहेत. अधूनमधून भेटतात, हातातली चंची पुढे करतात, सुपारी कातरून देतात. एकेरी बोलताना संकोचतात....