एकंदरीत मराठी सुशिक्षित लोकांच्या शुद्धलेखनाची अवस्थाच वाईट आहे. त्याचंच प्रतिबिंब वृत्तपत्रांसह सर्व माध्यमांत पडतं. एकेकाळी व्यवसायाच्या निमित्तानं मला पुष्कळ लोकांचं लिखाण वाचावं लागे. नैराश्य यावं इतकं वाईट असतं. एक कोश विकत घेऊन वापरावा इतकी साधी गोष्टही तथाकथित सुशिक्षित लोकांना सुचत नाही याचंच वाईट वाटतं. मुद्रितशोधकाशिवाय शुद्ध लिहू शकणारे चाळिशीच्या आतले लेखक आता जवळजवळ अस्तित्वात नाहीत.