त्यांनी खुलासा केला - मी मीच राहिलो नाही, हे काळानं माझ्यावर किती मोठे उपकार केले आहेत! - मी मोक्षाची भावना आहे; दुःखाची नाही.
वा! सुरेख! कैफी आझमींचे हे गाणे मला फार आवडते. 'प्रभात तपकीर'वाल्या आचार्य साहेबांना नमस्कार कळवा.
त्यांच्याशी गप्पा मारण्याचा एकदा योग आला. मी गझल, गुलजार वगैरे
म्हटल्यावर ते मला म्हणाले, गुलजार राहू द्या हो, शैलेंद्र तरी तुम्हाला
कळला आहे का?.......एका कार्यक्रमात मंगेश पाडगावकर शैलेंद्रबद्दल म्हणाले होते, कधी कधी
कविता वृत्त-अलंकारांतून मुक्त करणं (आणि तरी सुंदर करणं) हे जास्त अवघड
होऊन बसतं.
माझ्यामते गुलजार आणि शैलेंद्र ही दोन टोके आहेत. शैलेंद्रकडे आहे ती शुद्ध कविता. तो कुठलीही गिमिके (क्लृप्ती?) करत नाही. गुलजारची फिल्मी गाणी मला भरपूर आवडत असली तरी मला तो गिमिके करणारा (क्लृप्ती लढवणारा?) कवी१ वाटतो.
संजोप,
मिलिंद फणसे ह्यांच्याप्रमाणेच पहिल्या परिच्छेदातली जनरलायजेशने पटली नाहीत. बाकी लेख रंजक आणि रसाळ आहेच. आवडला. येऊ द्या.
१. कैफी आझमींनी तर एका मुलाखतीत गुलज़ार हा उर्दू गझलांची फिल्मी नक्कल करणारा एक 'फेक पोएट' आहे असे नमूद केल्याचे आठवते.