नाकी नव येणे.  एरवी आपले प्राण शरीराच्या नऊ द्वारांशी असतात. ते नाकाशी येऊन नाकावाटे निघून गेले की माणूस मरण पावतो. म्हणून नाकी नऊ येणे, म्हणजे मूळ अर्थः(१)मरणासन्न होणे, नऊ इंद्रियांची शक्ती नाकात येणे.. प्रचलित अर्थ: (२)(कामाने, श्रमाने) दमून जाणे. (३)अतिशय कंटाळणे. (४)अतिशय त्रास, कष्ट पडणे इ.. इंग्रजीत वाचण्यासाठी मोल्सवर्थ-कॅन्‍डी पान ४५४ पहा.